अहिंसेचे स्वरूप

अहिंसा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मुळात हा यौगिक आंतरिक साधनेचा शब्द आहे. परंतु कालांतराने लोकांनी त्याला बाह्य जगतातील जीव-हिंसेशी जोडले.

ह्या पुस्तकात आपल्याला पहायला मिळेल की, आपले पूर्वज महापुरुषांनी अहिंसा कोणत्या संदर्भात घेतलेली आहे. प्रस्तुत आहे - गीतेच्या आलोकात ‘अहिंसा’, महाभारताच्या आलोकात ‘अहिंसा’, श्रीरामचरित मानसात ‘अहिंसा’, महावीर स्वामींच्या दृष्टीने ‘अहिंसा’ आणि भगवान बुद्धांच्या दृष्टीने ‘अहिंसा’.

अनाकलनीये प्रश्न

ह्या पुस्तिकेत वर्ण, मूर्तिपूजा, ध्यान, हठ, चक्रभेदना आणि योग, हिंदू धर्म एखाद्या जीवनशैलीचे नाव आहे का, हिंदुत्व यांसारखे विषय स्पष्ट करून भ्रमित समाजाला मार्गदर्शन केलेले आहे.

अवयव का फडकतात? काय सूचित करतात?

परमेश्वर कोणत्याही वस्तू मार्फत बोलू शकतो - झाडे, दगड, जल पृथ्वी-आकाश, पशु-पक्षी, नदी तसेच डोंगर इत्यादि जड अथवा चेतन अशा कोणत्याही माध्यमातून आज्ञा देऊ शकतो. तो कर्ता-अकर्ता आहे. तो समर्थ आहे व सर्व काही करू शकतो. त्याची सार्वभौम सत्ता आहे. कान- डोळे-मन इत्यादी इंद्रियांनी ग्रहण करता येणारी समग्र सृष्टि परमेश्वराचेच साधन (यंत्र) आहे. आर्त, अनुरागी भक्तासाठी जेव्हा नयनरम्य असा परमेश्वर प्रेरक बनतो, तेव्हा सर्व स्थानांमार्फत आपले कार्य संपादित करतो.

ह्या पुस्तकात मानव शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणाऱ्या स्पंदनांचे कारण आणि त्यांच्या संकेतांचे विश्लेषण केलेले आहे, ज्यांची साधना करताना खूप मदत होते.

भजन कोणाचे करावे?

आदि धर्मशास्त्र गीता आणि इतर योगशास्त्रांनुसार एका परमात्म्याची पूजा आणि त्याच्या प्राप्तीची एक निर्धारित क्रिया (नियत कर्म) यांच्या ठिकाणी असंख्य पूजापद्धती प्रचलित आहेत. लोक गाय, पिंपळ, देवदेवता, भूतभवानी यांची पूजा धर्माच्या नावाने करीत असतात. प्रस्तुत पुस्तकातही ह्या सर्व भ्रमांचे निवारण करून स्पष्ट करून सांगितलेले आहे की सनातन धर्म म्हणजे काय. इष्ट कोण आहे? भजन कोणाचे करावे? आणि कसे करावे? पूर्वग्रहांपासून मुक्त असलेल्या मेंदूने ह्या पुस्तकाचा अभ्यास आणि मनन तुम्हाला ज्ञानी बनवील, भजन कोणाचे करावे हे स्पष्ट होईल. साधनापथावरील पथिकांसाठी हे प्रथम पुस्तक आहे. नक्की वाचा.

एकलव्याचा अंगठा

शिक्षण देणारे गुरू आणि सद्गुरूंमध्ये अंतर सांगीतले गेले आहे. शिक्षक लोकजीवनातील कला शिकवतात, तर सद्गुरू जीवनात समृद्धीबरोरच परमश्रेयाची जागृती आणि त्या परम पदाची प्राप्ती करून देतात, ज्यामुळे पुरुष जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होतो.

योगशास्त्रीय प्राणायाम

योगशास्त्रीय प्राणायामात त्यांनी सांगितलंय की, यम, नियम आणि आसन करताना श्वास-प्रश्वास शांतपणे प्रवाहित होणे म्हणजे प्राणायाम. प्राणायाम नावाची वेगळी कोणतीच क्रिया नाही. ही योगचिंतनाची एक अवस्था आहे. ह्याचेच उत्तर ह्या पुस्तकात दिलेले आहे.

प्रश्न समाजाचे – उत्तरे गीतेतील

श्री परमहंस आश्रम शक्त्तेषगड, चुनार, मिर्जापूर (उत्तर प्रदेश) मध्ये अवतरलेल्या कतिपय भक्तांनी गीतेच्या संदर्भित प्रश्नांची एक सूची महाराजश्री यांच्या समोर मे 2005 मध्ये प्रस्तुत केली, ज्याचे समाधान पूज्य महाराजश्री यांच्या श्रीमुखातून प्रस्तुत आहे.

या पुस्तिकेत सामाजिक, आध्यात्मिक आणि धार्मिक असे कोणतेही प्रश्न असोत, त्यांचे गीतेच्या आलोकात उत्तर दिलेले आहे.

पुनर्जन्म- हृदय

पुनर्जन्म - बौद्धिक स्तरावर पडलेला हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मनुष्याने जन्म घेतला, जीवन व्यतीत केले, शरीर सोडले, निघूनही गेला, काहीच समजले नाही की पुनर्जन्म आहे किंवा नाही. परंतु योगाभ्यासाच्या एका निश्चित उंचीवरून माणूस जेव्हा जातो, तेव्हा त्याला स्पष्टपणे दिसते की पुनर्जन्म आहे? मी काय होतो? पुढे कुठे जायचे आहे?

हृदय - शरीरात हृदय कुठे आहे, ज्यात परमात्मा राहतो? हृदयाचा परिचय आणि परमात्म्याला ओळखण्याच्या संपूर्ण विधीवर प्रकाश टाकलेला आहे. क्रमानुसार उन्नत होणारी तीन शरीरे आहेत - स्थूल, सूक्ष्म आणि कारण. अनुक्रमे कारण शरीराच्या अंतिम स्तरावर साधन पोहोचते, तेथे ईश्वर राहतो. ही पुस्तिका ह्या प्रश्नांचा संपूर्ण परिचय देते.